ब्लॉगविषयी

कधी कधी आपण एखाद्या संदर्भासाठी पुस्तकं चाळत असतो किंवा इंटरनेट गुगलून काढत असतो. अशावेळी कामाच्या माहितीबरोबरच इतरही अनेक मनोरंजक गोष्टी आपल्याला सापडून जातात. असं होता होता आम्हाला रिकाम्या वेळात अशा गोष्टी शोधायची सवयच लागून गेली आणि आम्ही एकमेकांना त्याच्या लिंक पाठवत राहिलो.

बरेचदा कुतुहलातूनसुद्धा आम्ही अनेक गोष्टींची शोधाशोध करायला लागलो, random आणि tangent विचार हे तर आमच्या “चला शोधूया” च्या सवयीला घातलेले पाणीच होते.

असं होता होता बराच ‘डेटा’ आमच्याकडं गोळा होत गेला आणि मग आम्ही आमचा धांडोळा सर्वांसाठीच खुला करण्याचा विचार केला. त्याचीच परिणीती म्हणजे हा ब्लॉग.

विषयाचे कोणतेही बंधन न ठेवता केलेली ही खर्डेघाशी आहे. कारण नेहमीच काही नेमस्त आणि सुसंगत विचार करण्याची गरज नसते. फारशा उपयोगी नसलेल्या गोष्टीच आयुष्यात आनंद निर्माण करत असतात.

लाईफ इज ब्युटीफुल सिनेमात अंकल इलिजिओ हेच तर सांगतात.
Nothing is more necessary than the unnecessary….

Blog at WordPress.com.

Up ↑