युद्धकैदी क्र.१

युद्धादरम्यान दोन्ही बाजू  नेहमीच  एकमेकांच्या सैनिकांना अटक करत असतात. शत्रूराष्ट्राने  अटक केलेल्या युद्धकैदयांना कशी  वागणूक द्यावी याच्यासाठी जिनेव्हा आंतरराष्ट्रीय करारानुसार काही नियम ही घालून देण्यात आलेले आहेत व सर्व युद्धात हे नियम पाळले जातात.
दुसऱ्या महायुद्धातही अनेक सैनिक युद्धभूमीवर शत्रूकडून पकडले गेले व युद्ध संपेतो त्यांनी कैदेतच दिवस काढले.अशा लाखो युद्धकैद्यांच्या गर्दीत एक कैदी मात्र वेगळा होता शत्रुच्याच काय तर त्याच्याही न कळत त्याने एक वेगळाच विक्रम घडवलेला होता.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला अमेरिका अजून युद्धात उतरलेली नव्हती पण इंग्लडला सैनिकी मदत करत होती.पण ७ डिसेंबर १९४१ ला जपानने पर्ल हार्बर या नाविक तळावर हल्ला केला आणि अमेरिकाही युद्धात ओढली गेली.
 १९१७ साली जन्मलेला काझुओ सकामाकी हा त्याच्या आई वडिलांच्या आठ मुलांपैकी एक, जपानच्या शिरस्त्याप्रमाणे त्याने त्याच्या कुटुंबातर्फे सम्राटाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि १९४० साली नौदलात अधिकारी म्हणून भरती झाला आणि त्याची नेमणूक एका पाणबुडीवर करण्यात आली. याचवेळेला जपानी सैन्याची अमेरिकेवरच्या हल्ल्यासाठी गुप्तपणे तयारी सुरू होती.
Kazuo_Sakamaki
जपानी सैन्याने हवाई हल्ल्यासोबतच पर्ल हार्बरवर पाणबुड्यातूनही हल्ला करण्याची योजना आखलेली होती. त्यासाठी पाच पाणबुड्या निवडण्यात आल्या होत्या.HA-19 नावाच्या या पाणबुड्या ७८ फूट लांब होत्या,त्यात १००० पौंडांचे 2 टॉर्पेडो (पाणसुरुंग) असत. या पाणबुड्यात दोन नाविक असत. हा हल्ला आत्मघातकीच असणार होता.काझुओच्या आई वडीलांना अनेक अपत्ये असल्याने त्याची निवड पर्ल हार्बरवरच्या हल्ल्यासाठी करण्यात आली.
1280px-Attack_on_Pearl_Harbor_Japanese_minisub
योजनेप्रमाणे या पाणबुड्या आपल्या कामगिरीवर निघाल्या पण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. काझुओच्या पाणबुडीने सुरुवातीपासूनच असहकार पुकारलेला होता,त्याच्या पाणबुडीतला गायरोकंपास (दिशादर्शक) बिघडला आणि त्याची पाणबुडी भरकटली.ती कशीबशी मार्गावर आली तोवर एका अमेरिकन विनाशिकेने त्यांना हेरून त्यांच्यावर गोळीबार केला. पाणबुडी धूर आणि पाण्याने भरून गेली.काझुओ व त्याचा पेटी ऑफिसर कियोशी इंगाकी दोघेही हवाई मधल्या ओहाऊ या बेटाजवळ पोचले पण तिथल्या खडकांना आपटून पाणबुडी पुरतीच निरुपयोगी झाली. या अपघातात इंगाकी मरण पावला. काझुओला अमेरिकन निमलष्करी दलातील एका सैनिकाने तो किनाऱ्यावर बेशुद्ध  पडला असताना कैद केले व त्याची नोंद अमेरिकन दप्तरात युद्धकैदी क्रमांक एक अशी करण्यात आली. काझुओ हा दुसऱ्या महायुद्धातला अमेरिकेने अटक केलेला पहिला युद्धकैदी.
POW_Kazuo_Sakamaki
 
पुढे जपानने शरणागती पत्करेपर्यंत म्हणजे १९४५ पर्यंत काझुओ अमेरिकेत युद्धकैदी म्हणून राहिला व युद्धानंतर त्याला जपानला परत पाठवण्यात आले. कैदेत असताना त्याने जपानच्या परंपरेला धरून आपल्याला आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी अशीही विनंती अमेरिकन लष्करी कोर्टाला केली ती अर्थातच अमान्य करण्यात आली.
 
युद्धानंतर काझुओ जपानची सुप्रसिद्ध मोटार कंपनी टोयोटा मोटर्समध्ये रुजू झाला आणि शेवटी टोयोटा कंपनीचा ब्राझीलमधील अध्यक्ष म्हणून निवृत्त झाला.
artb
त्याने आपल्या लष्करी सेवेतील आणि कैदेत असतानाच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत.
१९९९ साली तो जपानमध्ये वृद्धापकाळाने मरण पावला.

यशोधन जोशी

7 thoughts on “युद्धकैदी क्र.१

Add yours

  1. I liked ‘Dhandola’😊 – ‘Kaidi no.1’ It seems you might have a nice collection..Too much interested to go through other collection of your said Shop – ” Dukan” 😉as well, Yashodhan…

    Like

  2. सुरुवात दमदार. लेख माहितीपूर्ण. यशोधन लेखन छान झाले आहे.

    Like

Leave a Reply to Vedant Vyas Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: