इंग्लडच्या केंट परगण्यात एक छोटंस गाव आहे.शांत आणि टुमदार. हे गाव ज्यांना सरंजाम मिळालेले होते त्या जहागिरदारांना अर्ल (Earl) अशी उपाधी होती.या जहागिरदारांच्या कुळात जन्मलेले एक कुलदिपक होते चौथे अर्ल म्हणजेच जॉन मॉन्टेग्यू. हे साहेबराव सदैव कंटाळलेले, दिवसभर काय करावे हा प्रश्न सकाळी उठताच त्यांच्यासमोर उभा ठाकलेला असे.
पण प्रत्येक रोगाला औषध असते तसेच प्रत्येक कंटाळ्यालाही असते, वेळ कसा घालवावा या विवंचनेत असतानाच त्यांच्या भोवती असलेल्या मंडळीतल्या एकाने त्यांना पत्ते खेळण्याविषयी सुचवले आणि झालं ! अर्लसाहेबांना पत्ते खेळण्याची गोडीच लागून गेली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत साहेब फक्त पत्ते आणि पत्तेच खेळू लागले.दिवसाचं सोडा साहेबांना रात्री स्वप्नातही पत्तेच दिसू लागले.पत्ते खेळताना अर्लसाहेब तहानभूक विसरले, खेळताना मधेच उठून जेवायला जायचाही त्यांना कंटाळा येऊ लागला.
एके दिवशी असाच पत्त्यांचा खेळ अतिशय रंगात आलेला होता आणि जेवायची वेळही झालेली होती.अर्लसाहेबांची खेळाचे टेबल सोडून जेवण्याच्या टेबलावर जाऊन बसण्याची मुळीच इच्छा नव्हती म्हणून साहेबस्वारीने आपल्या स्वैपाक्याला बसल्या जागेवरून न उठता जे काही खाता येईल ते आणून देण्याचा हुकूम दिला. ही ब्रिटिश स्वैपाकी मंडळी जात्याच हुशार, त्याने आपलं डोकं चालवून दोन पावांच्या तुकड्यात मांसाचे तुकडे आणि इतर काहीबाही भरून हा नवीन पदार्थ अर्लसाहेबांच्या समोर पेश केला.
अर्लसाहेबांना हा नवीन पदार्थ फारच आवडला आणि तो हा पदार्थ रोजच खाऊ लागले. हळूहळू या पदार्थाची त्यांच्या आसपासच्या सगळ्यांनाही गोडी लागली.
भरपूर उत्सुकता ताणून झाल्यानंतर आता आपण या अर्लसाहेबांची ओळख करून घेऊया, हे आहेत 4th Earl of Sandwich आणि यातलं Sandwich हे नाव त्यांच्या गावाचं आहे. Earl of Sandwich वरूनच अर्लसाहेबांना आवडलेल्या पदार्थाचं नाव *सँडविच* पडून गेलं. ही सगळी कहाणी आहे सुमारे १७६० च्या सुमाराची.
पण खरं सांगायचं तर त्यांच्या सँडविच गावाचा अतिशय कंटाळा आलेला होता आणि त्यांची इच्छा होती की इंग्लडच्या राजाने आपल्याला Portsmouth गाव इनाम द्यावं,पण राजा यांच्या विनंती अर्जाकडे अजिबात लक्ष देईना आणि शेवटी अर्लसाहेबांची ती इच्छा अपूर्णच राहिली,नाहीतर आज आपण Portsmouth खात असतो.
Interesting.
Addl info related to this topic..
There is an idiom in English, ” best thing since sliced bread”, “greatest thing since sliced bread”.
A humorous and hyperbolic statement indicating one’s belief that something is excellent, especially something new and innovative.
LikeLike
बापरे असं पण असतं.
बघा पत्त्यांचे किती उपकार आहेत.
LikeLike
सँडविच…हे गावाचे नाव आहे व त्यावरूनच ह्या खाद्य पदार्थास सँडविच हे नाव पडले आहे…हे माहीतच नव्हते.
LikeLike
वा वा सुरेख
LikeLike
Va! 😊
LikeLike
भारीच माहिती!!
LikeLike
really Very humorous n informative blog…..👌👌
LikeLike
मस्त माहिती !
LikeLike