भाव खाऊन गेलेला पाव…

इटलीमध्ये नेपल्स नावाचे समुद्र किनाऱ्यावर वसलेले एक अत्यंत पुरातन शहर आहे. मुळात ही ग्रीकांची एक वसाहत होती जी इसपू ६० च्या आसपास वसलेली होती. १७-१८ व्या शतकात नेपल्स दारिद्र्याने पिचलेले एक शहर होते. या शहरातल्या लोकांचा ‘भिक्षांदेही’ हा प्रमुख उद्योग होता त्यामुळं खाण्याचे चोचले किंवा आवडनिवड हा विषय त्यांच्यासाठी वर्ज्यच होता. घरीच थापलेल्या जाड्या-भरड्या आणि गोल पावावर स्वस्तातले चीज, लसूण आणि टोमॅटोचे ‘टॉपिंग’ असलेला पिझ्झा रस्तोरस्ती विकला जाई.  पिझ्झा हा नेपल्सच्या लोकांचा प्रमुख आहार होता.

नेपल्स त्या काळी इटलीचा भाग नव्हते तर एक स्वतंत्र वसाहत होती. १८६१ साली नेपल्स इटलीचा भाग बनले आणि त्याची स्थिती हळूहळू सुधारू लागली. १८९० साली इटलीच्या राजा आणि राणीने नेपल्सला भेट दिली. ‘राजाला रोजच दिवाळी’ या उक्तीप्रमाणे रोजच उच्चभ्रू पद्धतीचे फ्रेंच जेवण जेवणाऱ्या राजा आणि राणीला त्याचा कंटाळा आलेला होता. नेपल्सच्या पिझ्झाविषयी माहिती मिळाल्यावर राणीने चवपालट म्हणून नेपल्समधल्या एका प्रसिद्ध पिझ्झा विक्रेत्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचा पिझ्झा मागवला.

त्यातला चीज, टोमॅटो व basil चं टॉपिंग असणारा आणि इटलीच्या झेंड्यासारखा दिसणारा पिझ्झा या राणीसाहेबांना फार म्हणता फारच आवडला. ज्याच्याकडून पिझ्झा मागवला होता तो दुकानदार धंद्यात भलताच मुरलेला होता, त्याने ताबडतोब या पिझ्झाचे राणीसाहेबांच्या नावे नामकरण करून टाकले.

66115664-cocept-of-a-lady-queen-contemplating-pizza

या राणीसाहेबांचे नाव होते Queen Margherita of Savoy आणि त्यांचे पती म्हणजे इटलीचे राजे Umberto I. एव्हाना तुमच्यासारख्या खवय्या वाचकांनी या पिझ्झाचे नाव Pizza Margherita हे ओळखले असेलच.

राणीसाहेबांना पिझ्झा आवडला ही बातमी इटलीभर पसरली  आणि नेपल्सच्याबाहेर फारसा माहीत नसलेला पिझ्झा इटलीत जाऊन पोचला. पण इतक्यावरच त्याची वाटचाल थांबली नाही, इटालियन निर्वासितांबरोबर पिझ्झा अमेरिकेतही जाऊन पोचला आणि Pizza hut, Dominos सारख्या ब्रँडच्या जोरावर त्यानं जग पादाक्रांत केलं.

आता यापुढं तुम्ही जेंव्हा कधीही पिझ्झाची ऑर्डर देण्यासाठी मेनुकार्ड हातात घ्याल तेंव्हा त्यातल्या एका पिझ्झाच्या नावाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल.

यशोधन जोशी

4 thoughts on “भाव खाऊन गेलेला पाव…

Add yours

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: