सन १९४१ दुसरे महायुद्ध ऐन भरात आले होते. जर्मनीने इंग्लंडवर जोरदार बॉम्बहल्ले चालवले होते. ब्रिटन मधील एका घराच्या छतातून एक जर्मन बॉम्ब आतमध्ये पडला. घरात घराचा मालक आणि ज्युलिआना नावाची त्याची ग्रेट डेन जातीची कुत्री दोघेच होते. आता बॉम्ब फुटणार तेव्हढ्यात ज्युलिआना उठली आणि तिने आपल्या मुताची धार त्या बॉम्बवर सोडून दिली. फुरफुरणारा बॉम्ब अर्थातच विझला आणि दोघांचे प्राण वाचले. ही बातमी पोहोचली ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे. ते सुद्धा ही बातमी ऐकून अचंबित झाले. त्यांनी ज्युलिआनाला मानाचे ब्लू क्रॉस पदक बहाल केले. याआधी ब्लू क्रॉस हे पहिल्या महायुध्दात चांगली कामगिरी करणार्या घोड्यांना देण्यात येत असे. ज्युलिआना ही पहिली कुत्री होती जिला ब्लू क्रॉस मिळाला.
पण ज्युलिआनाची धैर्याची कहाणी इथेच संपत नाही. १९४४ साली तिच्या मालकाच्या दुकानाला आग लागली असताना तिने आपल्या मालकाला भूंकून इशारे दिले. या बद्दलही तिला आणखी एक पदक मिळाले.
ब्रिस्टॉल येथील एका घराच्या झाडाझडतीत तिला मिळालेले दुसरे पदक आणि तिचे जलरंगात काढलेले चित्र मिळाले. चित्राच्या खालील भागात तिने विझवलेल्या बॉम्बची कथा तर पदकावर आग लागलेल्या दुकानाची हकिकत होती. ह्या गोष्टी लिलावात विकल्या गेल्या आणि लिलाव करणार्यांनी त्याची जाहिरात करताना ज्युलिआनाबद्दल ’A Great Dane with a great bladder’ असे वर्णन केले.
दुर्दैवाने १९४६ साली ज्युलिआना विषबाधेने मरण पावली.
Very interesting and catchy story
LikeLike
Quite interesting and catchy story
LikeLike